Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार; गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी
थोडक्यात
अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार
उत्तर प्रदेशातील बरेली येथील घरावर गोळबार
दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार
(Disha Patani) बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेलीतील घराबाहेर काल उशिरा रात्री झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. सिव्हिल लाइन्स परिसरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञात व्यक्तींनी तीन ते चार फायरिंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दिशा पाटनीच्या घरावर फायरींग केली. या घटनेत कुणालाही इजा झाली नसली तरी परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा तपास जोरात सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार गँगने घेतली आहे. गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी घेतली असून या पोस्टमध्ये काही व्यक्तींची नावे घेतली आहेत. चित्रपटसृष्टीला इशारा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र, या संदेशाची सत्यता पोलिसांकडून अद्याप तपासली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर बरेली पोलिसांनी अभिनेत्रीच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत संयम पाळण्याचे सांगितले आहे.