Harsha Richhariya :महाकुंभमध्ये प्रसिद्ध झालेली हर्षा रिचारिया उचलणार मोठे पाऊल

Harsha Richhariya :महाकुंभमध्ये प्रसिद्ध झालेली हर्षा रिचारिया उचलणार मोठे पाऊल

सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर हर्षा रिचारियाची आत्महत्येची धमकी, बदनामीच्या आरोपांवर महादेवाच्या शक्तीने लढण्याची तयारी.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाकुंभमध्ये प्रसिद्ध झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर आणि भोपाळची रहिवाशी हर्षा रिचारियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बदनामी होत असल्याने आत्महत्या करणार असल्याची धमकी देणारी पोस्ट शेअर केली आहे. काही लोक तिचा व्हिडीओ एडिट करुन बदनामी करत आहेत असा आरोप तिने केला आहे.

व्हिडीओमध्ये हर्षा म्हणते की, महादेवानी दिलेल्या शक्तीने मी लढणार आहे. काही धर्मविरोधी लोक मला कॉल, मेसेज करुन त्रास देत आहेत. माझे जुने व्हिडीओ व्हायरल करत असून तसेच ए-आयनेद्वारे व्हिडीओ बनवत आहेत. काही लोकांना एक स्त्री पुढे जात असल्याचे बघवत नाही, मला थांबवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. कोणत्याही सकाळी जर समजल की हर्षा रिचारियाने आत्महत्या केली. तर मी त्यासर्वजणांची नावे लिहून जाणार आहे. माझ्यासोबत कोणी काय केले? हे सर्व मी लिहीणार आहे. असे इन्फ्लुएंन्सर हर्षा रिचारियने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com