Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचं नवीन गाणं ऐकलं का?

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचं नवीन गाणं ऐकलं का?

राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह खास भजन गायले आहे.
Published by :
Team Lokshahi

राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. देशभरात वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह खास भजन गायले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी एक्स आणि फेसबुकर पोस्ट करत म्हटलं की, कैलाश खेर यांच्यासोबत 'हे राम' हे भजन गायलं आहे. भजन गायनामुळे सुखद आनंदाची अनुभूती आली. राममय भारतवर्षात रामभक्तीवर गायनसेवा करण्याचा सौभाग्य मला मिळालं आहे. असं म्हणत अमृता फडणवीस यांनी भजन ऐकण्यासाठी https://lnk.to/6fcV4jPo ही लिंक शेअर केली आहे. शिवाय लवकरच या भजनाचा व्हिडीओ येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

'हे राम' नावाने भजन गीताचा Music Album लाँच करण्यात आला आहे. हे भजन अनेक ऑनलाईन music प्लॅटफॉर्मवर ऐकता ऐवू शकते. लवकरच याचा व्हिडिओ देखील लाँच केला जाणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी फोटो शेअर करत दिली आहे. 'हे राम' या भजन गीताचे पोस्टर लाँच झाले आहे. अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासह या पोस्टरचे फोटो शेअर केले आहेत. टीप्स कंपनीने हा Music Album लाँच केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com