हृतिक रोशनच्या 'फायटर'चा फर्स्ट लूक आऊट!

हृतिक रोशनच्या 'फायटर'चा फर्स्ट लूक आऊट!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने त्याच्या डान्सने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने त्याच्या डान्सने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. नुकताच त्याचा आगामी चित्रपट 'फायटर'चा पहिला लूक समोर आला आहे.

हा सिनेमा 25 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलं आहे. हृतिक रोशन स्कवाड्रन लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या पोस्टरमध्ये तो फायटर विमानाला हात लावताना दिसत आहे.

या सिनेमात हृतिक रोशनसोबत दीपिका पादुकोणदेखील दिसणार आहे. या सिनेमात अनिल कपूर, आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट करण्यासोबत निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com