KAREENA KAPOOR PRAISES AKSHAYE KHANNA AFTER DHURANDHAR SUCCESS
Kareena Kapoor Statement

Kareena Kapoor Statement: 'तो खूप क्यूट आहे, मी वेडी आहे अक्षय खन्नासाठी…' 'धुरंधर' मधील रहमान डकैत गाजल्यानंतर करिनाचं मोठं विधान

Bollywood Buzz: ‘धुरंधर’मधील रहमान डकैतच्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना पुन्हा चर्चेत आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

'धुरंधर' चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेने सध्या संपूर्ण देशाला भुरळ घातली आहे. रणवीर सिंह हा या सिनेमाचा मुख्य नायक असला, तरी चर्चेचा खरा विषय ठरलाय तो अक्षय खन्नाचा अभिनय. रहमान डकैतच्या भूमिकेला त्याने आपल्या अभियन कौशल्याने असा उठाव दिला की, चित्रपटातील इतर स्टारकास्टवरही त्याची छाप जडली. विशेषतः बलुच गाण्यावरील ‘Fa9la’ या गाण्यावर केलेले त्याचे नृत्य आणि स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. या पार्श्वभूमीवरच करिना कपूरचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला असून, त्यात तिने अक्षय खन्नाबद्दल केलेल्या कौतुकाच्या वर्षावाची जोरदार चर्चा रंगते आहे.

KAREENA KAPOOR PRAISES AKSHAYE KHANNA AFTER DHURANDHAR SUCCESS
Dhurandhar Box Office Collection: धुरंधर'ने रचला इतिहास! दुसऱ्या वीकेंडमध्ये दमदार कमाई, ३५० कोटींचा टप्पा पार

करिना कपूर आणि अक्षय खन्ना यांनी 2004 साली आलेल्या प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हलचल’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्या काळात दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने अक्षयबद्दल आपला जबरदस्त क्रेझ उघड केला होता. शाळेत असताना ती अक्षयची किती मोठी फॅन होती, याची कबुली देताना करिना म्हणाली होती की, “अक्षयसाठी मी वेडी होते, मी ‘बॅचलर आहे’ असं सांगत फिरायचे.” तिने अक्षयच्या पदार्पण चित्रपट ‘हिमालय पुत्र’चा व्हिडिओ तब्बल 20 वेळा पाहिल्याचेही ती हसत हसत सांगते. त्या वेळी अक्षय खन्ना हा जवळजवळ प्रत्येक मुलीचा ‘क्रश’ होता आणि मीही त्याच्यामागे अक्षरशः वेडी होते, असे ती आवर्जून नमूद करते.

करिना पुढे म्हणाली होती की, “मी अक्षयचा ‘हिमालय पुत्र’ हा चित्रपट किमान 20 वेळा पाहिला आहे. त्या वेळी मी शाळेत शिकत होते आणि अक्षय खन्ना हा प्रत्येक मुलीचा क्रश होता… तो सर्वांचाच क्रश होता… मीही त्याच्यामागे अतिशय वेडी होते. ‘अरे अक्षय खन्ना, अक्षय खन्ना, मी बॅचलर आहे…’ असा माझा क्रेझ होता.” अक्षयने 1997 मध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटापासून त्याने तरुणांमध्ये वेगळीच चाहतावर्ग निर्माण केला.

KAREENA KAPOOR PRAISES AKSHAYE KHANNA AFTER DHURANDHAR SUCCESS
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेत E-KYC करताना चूक झाली? लगेच दुरुस्ती करा, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

अक्षय खन्नाबद्दल बोलताना करिना पुढे म्हणते, “मला अक्षय खूप आवडतो… जेव्हा मी त्याला पाहते, तेव्हा तो खूप क्युट दिसतो… तो खूप क्युट आणि खूप चांगला माणूस आहे. तो एक अद्भुत अभिनेता आहे. अक्षय खन्ना सर्वात परफेक्ट व्यक्ती आहे, तो हॉलिवूडमध्ये जाण्यास पात्र आहे. त्याचा अभिनय थेट मनाला भिडतो.” हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी अक्षय खन्ना अगदी परफेक्ट असल्याचे तिचे मत होते. करिना आणि अक्षय नंतर ‘36 चायना टाऊन’ या चित्रपटातही एकत्र दिसले.

‘हलचल’ या चित्रपटात अक्षय आणि करिनासोबत सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, अमरीश पुरी आणि परेश रावल यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट मल्याळम चित्रपट ‘गॉडफादर’चा हिंदी रिमेक होता. आज ‘धुरंधर’मधील रहमान डकैतच्या धमाकेदार भूमिकेमुळे अक्षय खन्ना पुन्हा चर्चेत आला असताना, करिनाचा जुना व्हिडिओ आणि तिची मनापासून केलेली प्रशंसा चाहत्यांमध्ये नव्याने उत्सुकता आणि चर्चेचा विषय बनली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com