मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! नाट्यगृह आणि सिनेमागृहांच्या दरात होणार वाढ

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! नाट्यगृह आणि सिनेमागृहांच्या दरात होणार वाढ

शहरात किंवा मुंबईत प्रत्येक ठिकाणी चित्रपट नाटक भरपूर प्रमाणात चालतात. त्यामुळे चित्रपटगृह, थिएटर्स ना पैसा मिळतोच पण आता ते होणार आहे की नाही यावर साशंका आहे.
Published by :
Team Lokshahi

शहरात किंवा मुंबईत प्रत्येक ठिकाणी चित्रपट नाटक भरपूर प्रमाणात चालतात. त्यामुळे चित्रपटगृह, थिएटर्स ना पैसा मिळतोच पण आता ते होणार आहे की नाही यावर साशंका आहे. नुकतंच पालिकेच्या विभागाने चित्रपट नाटक यांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच नागरिकांना मनोरंजनासाठी जास्त पैसे मोजावे लागतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मनोरंजन सृष्टी महागणार असून नागरिकांना आता त्याचा फटका बसणार आहे. मुंबईकरांसाठी मनोरंजन महाग होणार आहे. महापालिकेने 2024-25 मध्ये नाट्यगृह चित्रपटगृह सर्कसच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव केला आहे आणि तो पालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार वातानुकूलित चित्रपटगृहांतील प्रत्येक प्रयोगाला 60 वरुन 200 रुपये, तर विनावातानुकूलित चित्रपटगृहांसाठी प्रत्येक शोचे कर हे 45 वरुन 90 रुपये होणार आहेत. नाटकांच्या प्रत्येक प्रयोगावरील 25 रुपये कर 100 रुपये होण्याची शक्यता आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सिंगल स्क्रीनच्या तुलनेत अद्ययावत मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता 13 वर्षानंतर पालिका या करात वाढ करण्याचा विचार करत आहे.

प्रशासनाकडे हा कर मंजूर झाल्यास नाटक आणि चित्रपटगृहात तिकिटात दर वाढ होणार असून महापालिकेला वर्षाला 10 कोटींचा महसूल प्राप्त होईल. तसेच 2011 नंतर मुंबई महापालिकेने नाट्यगृह चित्रपटगृह आणि सर्कसच्या घरात वाढ केलेली नव्हती. एकाच वेळी मल्टिप्लेक्स वर चार-पाच सिनेमे दाखवले जातात. तसेच चित्रपटांच्या लोकप्रियतेवर चित्रपटाचे किंमत ठरवलेली असते. त्यामुळे 13 वर्षानंतर हा कर वाढ करणार असून अंदाजे 200 रुपये कर वाढीची शक्यता आहे. तर बिगर वातानुकूलित नाट्यगृह आणि चित्रपटगृहांसाठी 45 रुपयांपासून ते 90 रुपये वाढ केली जाऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com