influencer prathamesh kadam death prathamesh kadam passes away know what exactly happened
influencer prathamesh kadam death prathamesh kadam passes away know what exactly happened

Influencer Prathamesh Kadam Death: धक्कादायक! प्रसिद्ध Reel स्टार प्रथमेश कदमचे निधन, कारण काय?

सोशल मीडियावर आई-मुलाच्या गोड नात्यामुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदम याचे अचानक निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

सोशल मीडियावर आई-मुलाच्या गोड नात्यामुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदम याचे अचानक निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांसह संपूर्ण इन्फ्लुएन्सर विश्वाला मोठा धक्का बसला आहे. प्रथमेश आपल्या आईसोबत बनवलेल्या साध्या, मनापासूनच्या आणि विनोदी व्हिडीओंसाठी ओळखला जायचा. त्याच्या प्रत्येक व्हिडीओत मराठमोळेपणा, आपुलकी आणि प्रामाणिक भावना दिसायच्या, त्यामुळे तो अल्पावधीतच लाखो लोकांचा लाडका झाला होता.

त्याच्या निधनाची माहिती सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरने इंस्टाग्रामवर भावनिक शब्दांत दिली. “तू कायम आमच्या आठवणीत राहशील,” असे लिहित तन्मयने प्रथमेशला श्रद्धांजली वाहिली. या पोस्टवर अनेक कलाकार, मित्र आणि चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

गेल्या काही काळात प्रथमेश आजारपणाशी झुंज देत होता. तरीही तो हॉस्पिटलमधूनही व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायचा. आयुष्यातील चढ-उतार, संघर्ष आणि आनंद तो खुलेपणाने मांडायचा, त्यामुळे लोकांना तो आपलासा वाटायचा. प्रथमेशच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबावर आणि आईवर मोठा आघात झाला आहे. सोशल मीडियावर हास्य पसरवणारा हा चेहरा आज आठवणींतच उरला असून, त्याने दिलेले आनंदाचे क्षण कायम लक्षात राहतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com