“माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत जग्गू आजोबांची भूमिका आता ‘हा’ कलाकार साकारणार

“माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत जग्गू आजोबांची भूमिका आता ‘हा’ कलाकार साकारणार

Published by :
Team Lokshahi
Published on

"माझी तुझी रेशीमगाठ" (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका आता नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. यश आणि नेहा यांचे जुळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मालिकेत जग्गू आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तर जग्गू आजोबांची भूमिका आता प्रदीप वेलणकर (Pradeep Velankar) साकारणार आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मोहन जोशींनी हे जगन्नाथ चौधरी पात्र साकारलं होतं.त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. पण अलीकडेच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये जगन्नाथ चौधरी यांच्या भूमिकेत मोहन जोशींच्या जागी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप दिसून आले आहेत. त्यामुले आधीचे जगन्नाथ चौधरी अर्थात मोहन जोशी यांनी मालिकेतून एक्झिट (Exit) घेतल्याचे समजते आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com