Jayeshbhai-Jordaar-PosterTeam Lokshahi News
मनोरंजन
'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज!
यशराज फिल्म्स निर्मित हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट 13 मे 2022 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट विनोदी चित्रपट असला तरी यातून एक सामाजिक संदेशही देण्यात येणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' हा सिनेमुळे चर्चेत आहे. 19 एप्रिलला या सिनेमाचा ट्रेलर आऊट होणार आहे.
रणवीरने नुकतेच 'जयेशभाई जोरदार' सिनेमाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.'जयेशभाई जोरदार' या सिनेमाचे शूटिंग फेब्रुवारी 2020 मध्येच पूर्ण झाले आहे. पण कोरोना महामारीमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 13 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'नाम है जयेश और काम है जोरदार ' असं म्हणत रणवीरने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली होती.