Riteish Deshmukh Birthday: अभिनेता रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने केली भावूक पोस्ट

Riteish Deshmukh Birthday: अभिनेता रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने केली भावूक पोस्ट

'तुझे मेरी कसम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री जेनेलियाने पती रितेशसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक पोस्ट शेअर केला आहे.

'तुझे मेरी कसम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री जेनेलियाने पती रितेशसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक पोस्ट शेअर केला आहे. जेनेलियाचे पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जेनेलिया पोस्ट करत म्हणते, 'जर रितेश देशमुख कोण आहे? असा प्रश्न मला कोणी विचारला, तर मी एवढंच म्हणेन, तो संपूर्ण जगातला खूपच चांगला मनुष्य आहे आणि तो फक्त माझा आहे. Happy Birthday नवरा!” जेनेलियाने शेअर केलेल्या पोस्टवर पती रितेश देशमुख म्हणतो, 'आय लव्ह यू बायको. तू माझ्यासाठी काय आहेस याची कदाचित तुला कल्पनाही नसेल. तू माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनवलंस.'

2003 साली आलेल्या 'तुझे मेरी कसम' सिनेमाच्या शूटवेळी त्यांच्यात मैत्री झाली. यानंतर रितेश आणि जेनेलिया यांच्यात मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी २ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केले. सध्या रितेश आणि जेनेलिया या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com