Marathi Flim Award Function : "अभी मैं हिंदी में बोलूं?", हिंदीत बोलायला सांगितल्यावर काजोल पापाराझींवर भडकली
5 ऑगस्ट 2025 रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित 60 वा आणि 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा विशेष स्वरूपात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री काजोल हिला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आलं.
यादरम्यान या पुरस्कारात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल देवगणला हिंदी मनोरंजन क्षेत्रातील 33 वर्षांच्या अमूल्य योगदानाबद्दल 'राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे याच दिवशी काजोलचा 51 वा वाढदिवस होता, त्यामुळे हा सन्मान तिच्यासाठी अधिकच खास ठरला. या पुरस्कारासोबत तिला सन्मानचिन्ह आणि 6 लाख रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं.
यावेळी कार्यक्रमापूर्वी अभिनेत्री काजोलला पापाराझींनी हिंदी बोलण्यास सांगितल्यानंतर ती त्यांच्यावर चिडलेली पाहायला मिळाली. यावेळी काजोल म्हणाली की, "आता मी हिंदीतून बोलू? ज्याला समजायचं तो समजतील" त्याचसोबत पुढे काजोल म्हणाली की, "मला मराठी चित्रपटात काम करायला खूप आवडेल, चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्की काम करेन. माझ्या आईला हा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे मला हा पुरस्कार मिळणे जास्त अभिमानाचे आहे".
अभिनेत्री काजोलला हिंदीतून प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिलेला पाहायला मिळाला. "आता मी पुन्हा हिंदीतून बोलू? ज्यांना समजायचे ते समजून घेतील" असं कालोज म्हणाली. पुढे बोलताना काजोलने सांगितलं की, मला मराठी चित्रपटात काम करायला खूप आवडेल, चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्की काम करेन. माझ्या आईला हा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे मला हा पुरस्कार मिळणे जास्त अभिमानाचे आहे". असेही तिने सांगितलं. दरम्यान काजोलची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांच्या प्रतिक्रिया देखीलल पडत आहेत.