कंगनाच्या ‘तेजस’ची सोशल मीडियावर चर्चा

कंगनाच्या ‘तेजस’ची सोशल मीडियावर चर्चा

Published by :
Published on

हिंदी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री कंगना रानावत चित्रपटाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.तिच्या अभिनयामुळे तिली बॉलीवूडची क्विन म्हणतात.काही दिवसांपूर्वी 'तेजस' या चित्रपटाची घोषणा केली होती.दरम्यान सोशल मीडियावर कंगनाने एक पोस्ट शेअर करत चित्रपटाचे शुटिंग सुरू केल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

कंगना या चित्रपटात भारतीय बनावटीच्या 'तेजस' या फायटर प्लेनच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. एका साहसी फायटर पायलटची ही कथा आहे. सर्वेश मेवार दिग्दर्शित हा चित्रपट २०१६ च्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे.

कंगनाने सोशल मीडियावर चित्रपटाविषयी अनुभव शेअर करताना लिहिले की, मी तेजसची शुटिंग सुरू केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगना वैमानिकाच्या गणवेशात आहे. कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी आजपासून #तेजस नव्या मिशनची सुरुवात करत आहे. जोश खूप आहे. माझ्या टीमचे याबद्दल मी आभार मानते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com