Shivsena: 'आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा', ठाकरे सरकार धोक्यात आल्यानंतर कंगनाचं विधान व्हायरल

Shivsena: 'आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा', ठाकरे सरकार धोक्यात आल्यानंतर कंगनाचं विधान व्हायरल

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

सध्या शिवसेना पक्षात झालेल्या बंडामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची अडचणीत आली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही चेहरा उतरल्याचे दिसून येते. एकंदरीत शिवसेना पक्षातील या बंडखोरीमुळे शिवसेनेवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेलं एक ट्विट सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.

Shivsena: 'आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा', ठाकरे सरकार धोक्यात आल्यानंतर कंगनाचं विधान व्हायरल
मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करणार का?

कंगना आणि शिवसेना यांच्यात वाद रंगल्यानंतर कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडला होता. त्यानंतर, कंगनाने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टिका केली होती. कंगनाने व्हिडिओ ट्विट करुन, आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड टुडेगा ! याद रखना, ये एक जैसा नही रहता, असे कंगनाने म्हटले होते.

राज्यातील राजकीय घडामोडींवर सध्या अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच कंगनाचे हे ट्विट व्हायरल होत आहे. कंगनाने या ट्विटमध्ये म्हटलेलं वाक्य सोशल मीडियावर पुन्हा नव्याने दिसत आहे. कारण, शिवसेनेत मोठी फूट पडली असून मंत्री एकनाथ शिंदे तब्बल 34 आमदार घेऊन शिवसेनेपासून दूर गेले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com