ना हिंदू ना इस्लाम; करीना कपूर फॉलो करते 'हा' धर्म, तैमूरच्या नॅनीचा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या फिल्मी करिअरसोबतच वैयक्तिक जीवनामुळे देखील चर्चेत असते. नुकतेच प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. करिना कपूरने सैफ अली खानसोबत 2012साली लग्नगांठ बांधली. लग्नानंतर करीना पतौडी कुटुंबाची सून झाली. दरम्यान, करीना हिंदू आहे आणि सैफ मुस्लिम आहे. यामुळे अनेक वेळा तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ती कोणत्या धर्माचे पालन करते, हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. यावरच तिच्या मुलाची नॅनी ललिता डिसिल्वा यांनी मोठा खुलासा केला आहे.
तैमूर-जेहची आया ललिताने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत करीनाच्या धर्माबद्दल सांगितलं. तिने खुलासा केला होता की, ती हिंदू किंवा मुस्लिम नाही तर ख्रिश्चन धर्माचे पालन करते.
ती म्हणाली की, करिना तिची आई बबिताप्रमाणेच ख्रिश्चन धर्माचे पालन करते. ती मला सांगायची की मी मुलांसाठी भजन गाऊ शकते, म्हणून मी मुलांसाठी भजन म्हणायचे. ती मला एक ओंकार वाजवायला सांगायची. तिला मुलांच्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक हवे आहे. त्यामुळे ती ओंकार लावायला सांगायची. मात्र ती स्वतः ख्रिश्चन धर्माचं पालन करते.
दरम्यान, सैफ अली खान आणि करीनाने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमुर असं ठेवलं. या नावावरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली होती. याविषयी करीनाने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “मला वाटतं की कोणत्याही आई किंवा मुलाला अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये. मला आजही त्या ट्रोलिंगमागचं कारण कळत नाही. कारण कोणालाच इतरांचा अपमान करायचा नसतो किंवा दुखवायचं नसतं. आपल्याला भाषणस्वातंत्र्य आहे, आपल्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य आहे. किमान मला आणि सैफला तरी असंच वाटतं”, असं ती म्हणाली. यावेळी करीनाने तैमुर या नावाचा अर्थ ‘लोह पुरुष’ असा सांगितला होता.