बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची ओमायक्रॉनची रिपोर्ट आली समोर

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची ओमायक्रॉनची रिपोर्ट आली समोर

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हीची काही दिवसांपुर्वीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यावेळी तिला घराच अलगीकरणात ठेवण्यात आले होते. याच दरम्य़ान तिची ओमायक्रॉनची चाचणी देखील करण्यात आली होती.या चाचणीचे रीपोर्ट आता समोर आले आहेत. आणि हे रिपोर्ट चाहत्यांसाठी सुखावणारे आहेत.

गेल्या आठवड्यातच अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सुत्रांच्या माहितीनुसार दोघींनीही मुंबईतील पार्ट्यांमध्ये उपस्थित कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते. या अभिनेत्रींसोबत त्यांच्या इतर मैत्रिणीही त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळे करीना कपूर आणि अमृता अरोरा या सुपर स्प्रेडर असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बीएमसीने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

या दरम्यान करीना कपूर खानला ओमायक्रॉनची लागण तर झाली नाही ना,यासाठी तिचे जिनोम सिक्वेन्स रिपोर्ट ही तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ही रिपोर्ट आता समोर आले असून तीची चाचणी नकारात्मक आली आहे. मुंबई महापालिकेने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे हा करीनासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com