कोरोना निगेटिव्ह येताच करीनाच्या पार्ट्या पुन्हा सुरु!

कोरोना निगेटिव्ह येताच करीनाच्या पार्ट्या पुन्हा सुरु!

Published by :
Published on

बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी करीनाची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, करीनाच्या करोना टेस्टची रिपोर्ट येण्याआधी तिने चार ते पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये करीनासोबत मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा देखील दिसली होती. करीनानंतर अमृताची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, आता करीना आणि अमृताची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून अमृता सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत करीना आणि अमृता ग्लॅमरस दिसत आहे. हा फोटो शेअर करत आम्ही परत आलो आहोत. शुक्रवारी करीनाने तिची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले होते. आता करोनातून बाहेर आल्यानंतर करीनाने पुन्हा एकदा पार्टी करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, करीना लवकरच 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात करीना दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गम्प' या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com