Khichdi 2: 'प्रफुल'चा 'हंसा' पुन्हा येतोय मोठ्या पडद्यावर, खिचडी 2 चा मजेशीर टीझर आऊट

Khichdi 2: 'प्रफुल'चा 'हंसा' पुन्हा येतोय मोठ्या पडद्यावर, खिचडी 2 चा मजेशीर टीझर आऊट

पारेख कुटुंब येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'खिचडी २'चा टीझर प्रदर्शित
Published by  :
Team Lokshahi

छोट्या पडद्यावरील कॉमेडी मालिका म्हणून खिचडी ओळखली जाते. ही मालिका सप्टेंबर २००२मध्ये प्रदर्शित झाली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर २०१०मध्ये या मालिकेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या चित्रपटाचे नाव देखील खिचडी होते. आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

तसेच "या दिवाळीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये", असंही या टीझरमध्ये लिहिलेलं दिसत आहे. प्रेक्षक खिचडी 2 चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

खिचडी 2 (Khichdi 2) या चित्रपटात हंसा पारेख ही व्यक्तिरेखा सुप्रिया पाठक (Supriya Pathak) यांनी साकारली आहे. खिचडी या चित्रपटामधील सुप्रिया पाठक यांच्या विनोदी शैलीनं अनेकांची मनं जिंकली होती. सुप्रिया पाठक कपूर, राजीव मेहता ( Rajeev Mehta), अनंग देसाई (Anang Desai), वंदना पाठक (Vandana Pathak), कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) आणि जमनादास मजेठिया हे कलाकार खिचडी 2 या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

अभिनेत्री निमिषा वखारिया (Nimisha Vakharia) यांनी खिचडी या चित्रपटात जयश्री ही भूमिका साकारली होती. आता खिचडी-2 (Khichdi 2) चित्रपटामधील ही भूमिका अभिनेत्री वंदना पाठक या साकारणार आहेत. प्रेक्षक खिचडी 2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com