Ankita Prabhu Walawalkar : कोकण हार्टेड गर्ल अडकली लग्नबंधनात; डीपी दादाने पिळला कुणालचा कान आणि म्हणाला.....
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी 5’ची स्पर्धक अंकिता वालावलकरची नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. संगीत दिग्दर्शक कुणालसोबत अंकिताने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. धुमधड्याकात पार पडलेल्या लग्नसोहळयाचे फोटो अंकिताने सोशलमिडीयावर पोस्ट केले. लग्नामध्ये बिग बॉस सीझन ५ च्या स्पर्धकांनी उपस्थिती लावली होती. अंकिताने लग्नाच्या पोस्टमध्ये 'वालावलकरांचो थोरलो जावई' असे कॅप्शन लिहीले आहे.
अंकिता वालावलकरला कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखले जाते. बिग बॉस सीझन ५ मध्ये स्पर्धक म्हणून ती सामील झाली होती. अंकिताने कोकणी भाषेला बिग बॉसच्याद्वारे घराघरांमध्ये जाऊन पोहचवले. अंकिताने बिग बॉसच्या घरामध्ये तिच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर या कोकण हार्टेड गर्लचं हृदय नक्की कोणी चोरलं हे समजण्यासाठी चाहते उत्सुक होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिताने कुणालसोबत 'सुर जुळले' असे कॅप्शन टाकत फोटो पोस्ट शेअर केला.
अंकिताच्या लग्नामध्ये बिग बॉस सीझन ५ चे स्पर्धकांनी उपस्थिती लावली होती. डीपी म्हणजेच कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार हा अंकिताला बहीण मानतो. बिग बॉसच्या घरात धनंजय म्हणाला होता की, 'मी तुझ्या लग्नानाला येईन'. धनंजय त्याची पत्नी, आई- वडील, मुलं सर्वकुटुंब अंकिताच्या लग्नामध्ये सामील झाले होते. धनंजय बरोबरच पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, योगिताचा नवरा सौरभ चौघुले, पुरुषोत्तम दादा पाटील ही सगळी मंडळी अंकिताच्या लग्नाला उपस्थित होते.
लग्नाच्या विधीमध्ये महत्त्वाचा विधी म्हणजे कानपिळिचा. भावाने नवऱ्या मुलाचा कान पिळत माझ्या बहीणीचा सांभाळ कर असं, सांगण्याची रित आहे. अंकिताला दोन बहीणी असल्याने अंकिताच्या बहिणीनी कुणालाचा कान पिळला. त्यानंतर मात्र डीपी म्हणजे धनंजयने कुणालचा कान पिळतं 'बहिणीची काळजी घे' असं सांगितले आहे. या विधीचा फोटो सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.
अंकिताच्या लग्नाच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. अंकिताचा नवरा कुणाल भगत हा एक संगीत दिग्दर्शक आहे. 'आंनदवारी' म्युझिक अल्बमसाठी दोघांनी एकत्र काम केले होते. कुणालने करणच्या साथीने 'येक नंबर' या चित्रपटातील गाणी संगीतबंध केली आहेत. तसेच झी मराठीवरील आगामी मलिका 'तुला जपणार आहे' महामालिका 'श्री निवास' या दोन मालिकेना त्यांने आपले संगीत दिले आहे.