ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

Ashok Saraf : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली असून अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हंटले आहे. या पुरस्कारानिमित्त अशोक सराफ यांच्यावर सर्वच स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीत नुकतीच ५० वर्ष पूर्ण केली आहेत. अशोक सराफ यांच्या नावावर प्रेक्षक आजही चित्रपट पाहायला जातात कारण प्रेक्षकांना पूर्णपणे ठाऊक असते की त्यांचा चित्रपट पैसे वसूल करून देणारा असतो. अशोक सराफ यांना अशोकमामा या नावानेच अनेकजण ओळखतात. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती. अशी ही बनवाबनवी चित्रपटाचील अशोक सराफ यांची धनंजय मानेंची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com