Siddharth Chandekar
Siddharth Chandekarteam lokshahi

Siddharth Chandekar: माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न; असे म्हणत सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरं लग्न

मराठी सिनेइंडस्ट्रीतला चाॅकलेट बाॅय सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी नुकतेच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.
Published by :
Team Lokshahi

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून तो कायमच चर्चेत असतो. त्याने त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सिद्धार्थ चांदेकर नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतो आणि समाजात केवळ बोलत बसण्यापेक्षा काहीतरी करून दाखवणं महत्त्वाचं आहे हेच त्याने सिद्ध केले आहे.

Siddharth Chandekar
Siddharth Chandekarinstagram

सिद्धार्थने त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी नुकतेच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. आज सकाळी सिद्धार्थने सोशल मिडियावर त्याच्या आईच्या लग्नाचा फोटो शेअर करत ही बातमी सर्वांना सांगितली. थाटामतात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्याबद्दल सिद्धार्थने सोशल मिडियावरून सांगताच त्याचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. चाहतेच नाही तर इतर कलाकार देखील त्याचे सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.

Siddharth Chandekar
Siddharth Chandekarinstagram

सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईच्या लग्नातला एक फोटो शेअर करत लिहिलं, Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life

Siddharth Chandekar
Siddharth Chandekarinstagram
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com