मनोरंजन
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी 2 लाखाची सुपारी, पोलिसांनी सांगितले...
फोन करणाऱ्याने सांगितलं की, टायगर श्रॉफच्या जीवाला धोका आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. असे असतानाच अभिनेता टायगर श्रॉफला धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने सांगितलं की, टायगर श्रॉफच्या जीवाला धोका आहे. त्याला मारण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणात पंजाबमधील एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यांना हा दावा खोटा असल्याचं आढळलं. मुंबई पोलिसांनी मनीष कुमार सुजिंदर सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.