“नसीरुद्दीन शाहचा अपघात व्हावा, यासाठी मी नवस केला होता” असे नाना पाटेकर का म्हणाले?

“नसीरुद्दीन शाहचा अपघात व्हावा, यासाठी मी नवस केला होता” असे नाना पाटेकर का म्हणाले?

‘सिंहासन’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

‘सिंहासन’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचा कायम लक्षात आहे. १९७९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज या चित्रपटाला ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे शरद पवार, जब्बार पटेल हे उपस्थित होते.

यावेळी नाना पाटेकर यांनी चित्रपटातील अनेक मजेशीर किस्से सांगितले. यावेळी त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला की, मी खरंच सांगतो की मी देव मानत नाही यामागील कारण नसीरुद्दीन शाह. मराठीत जब्बार हे नेहमी मोहन आगाशे यांना चित्रपटात घेत आणि हिंदीत श्याम बेनेगल हे ओम पुरी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम करीत. सिंहासननंतर जब्बार यांनी मला कोणत्याच चित्रपटात घेतलं नाही. त्यावेळी मी नसीरुद्दीनला अपघात व्हावा, त्याचे हातपाय मोडावेत यासाठी बरेच नवस केले, जेणेकडून नसिरच्या भूमिका मला मिळतील, पण तो नवस काही पूर्ण झाला नाही. यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला असे नाना पाटेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com