Naseeruddin Shah | नसीरुद्दीन शाहंना रुग्णालयातून डिस्चार्ज
बॉलिवूडचे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. त्यांचा मुलगा विवान शाह याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे नसीरुद्दीन यांच्या डिस्चार्जची माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती खालावली होती.त्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध 'हिंदुजा हॉस्पिटल' मध्ये दाखल करण्यात आले होते.नसीरुद्दीन शाह यांनी फुफ्फुसात न्यूमोनियाची लागण झाली होती. ज्यानंतर त्यांना 29 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आता नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. शाह यांना बुधवारी सकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांचा मुलगा विवान शाह याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे नसीरुद्दीन यांच्या डिस्चार्जची माहिती दिली आहे.
विवानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये नसीरुद्दीन यांची दोन छायाचित्रे शेअर केली आहेत, यातील एका फोटोमध्ये ते आपली पत्नी रत्ना पाठक शाहसोबत दिसले आहेत. दुसर्या छायाचित्रात अभिनेते एकटेच बसलेले दिसत आहेत, पण बाजूला असलेल्या आरशात रत्नाही दिसत आहे.
पहिली पोस्ट शेअर करताना विवानने "बॅक टू होम" लिहिले आहे, तर दुसर्या फोटोमध्ये लिहिले आहे की, "त्यांना आजच सकाळीच डिस्चार्ज मिळाला आहे". अभिनेत्याचे हे दोन्ही फोटो त्याच्या बेडरूममधील असल्याचे दिसत आहे. आता नसीर घरी आले आहेत, तेव्हा त्यांचे चाहते याबद्दल खूप आनंदित झाले आहेत.

