Rakhi Sawant
Rakhi Sawant Team Lokshahi

राखीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी घेतला आक्षेप; म्हणातायत, एवढी दुःखात आहे तर...

आईच्या निधनाने सध्या ती प्रचंड दुःखात दिसत आहे. त्यातच तिने रडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला.
Published by :
Sagar Pradhan
Published on

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत ही सतत चर्चेत येत आहे. नुकताच ती बिग बाॅसच्या घरात गेले होती. घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. लग्नाचे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता. लग्नासोबत तिने आपले नावही बदलून टाकले होते. यातच तिची आई आजारी होती. २९ जानेवारी रोजी राखीच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनाने सध्या ती प्रचंड दुःखात दिसत आहे. त्यातच तिने रडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यावरून आता चाहते तिला ट्रोल करताना दिसत आहे.

आईचे निधन झाल्यानंतर राखी सावंत हाॅस्पीटलबाहेर रडताना दिसली होती. नुकताच सोशल मीडियावर राखी सावंत हिने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी रडताना दिसल आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला दिलासा दिला आहे. तर अनेकांनी याच व्हिडीओवर आक्षेप देखील घेतला आहे. अनेकांनी म्हटले आहे की, इतकी जास्त दु:खात आहे तर मग व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्याची काय गरज आहे हिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com