संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त ‘केजीएफ 2’चे नवे पोस्टर रिलीज

संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त ‘केजीएफ 2’चे नवे पोस्टर रिलीज

Published by :

बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' अर्थात संजय दत्त आज आपला ६२ वाढदिवस साजरा करत आहे. संजू बाबाने यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांसाठी अनोखे गिफ्ट दिले आहे. 'केजीएफ २' या बहूचर्चित चित्रपटात संजय दत्तच्या 'अधीरा' या भूमिकेबाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवे पोस्टर संजय दत्तने रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त खूप भयानक रुपात दिसत आहे. संजय दत्त साकारत असलेल्या 'अधीरा'च्या लुकचे यापूर्वी सुद्धा अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत.

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर संजय दत्तने रिलीज केले आहे. या पोस्टरमधील संजय दत्तचा भयानक लुक पाहून 'केजीएफ २'साठी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. संजय दत्तने या पोस्टरमध्ये त्याच्या हातात तलवार पकडलेली दिसत असून त्याच्या मागे लोकांचा समुह दिसून येत आहे. संजय दत्तने हे पोस्टर शेअर करताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com