Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांना खास मैत्रिणीकडून सरप्राइज! गोड गप्पांसह जुन्या आठवणींना उजाळा; जाणून घ्या कोण आहे 'ती'

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांना खास मैत्रिणीकडून सरप्राइज! गोड गप्पांसह जुन्या आठवणींना उजाळा; जाणून घ्या कोण आहे 'ती'

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका अशोक मा.मा.च्या सेटवर मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आणि वर्षा उसगावकर यांच्या जुन्या मैत्रिणीने सरप्राइज भेट घेतली.
Published by :
Prachi Nate
Published on

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका अशोक मा.मा. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे भैरवीची म्हणजेच त्यांच्या सुनेची पहिली मंगळागौर साजरा करण्याचा घाट घालताना पाहायला मिळाले. या मंगळागौरीला एका खास व्यक्तीने उपस्थिती लावली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर या मालिकेतील मंगळागौरीचं एक खास आकर्षण ठरल्या.

यावेळी वर्षा उसगांवकर पारंपरिक नऊवारी साडी, गजरा आणि पारंपरिक साजश्रृंगारासह सुहासिनी म्हणून सजून सहभागी झाल्या होत्या. त्याचसोबत त्यांनी मंगळागौरच्या निमित्ताने पारंपारिक गाणी, खेळ आणि नृत्य देखील केले. यावेळी अशोक मा.मा. या मालिकेच्या सेटवर मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी वर्षा उसगावकर यांची सरप्राइज भेट घेतली.

यावेळी वर्षा उसगावकर बसलेल्या असताना समोरुन अचानक निवेदिता सराफ आल्या, त्यांना पाहून वर्षा उसगावकर आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं. दोघींनी एकमेकीची गळाभेट देखील घेतली. त्यानंतर निवेदिता सराफ यांनी वर्षा उसगावकर यांनी परिधान केलेल्या दागिन्यांचे कौतुक केल्याच पाहायला मिळाल. तसेच यावेळी दोघींच्या गोड गप्पा रंगल्या असून त्यांनी जून्या आठवणींना उजाळा देखील दिला.

दरम्यान वर्षा उसगांवकर या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या जून्या मैत्रीण आहेत. अशोक सराफ हे तब्बल 18 - 20 वर्षांनी वर्षा उसगांवकर यांना भेटल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होत. यापुर्वी वर्षा उसगांवकर आणि अशोक सराफ यांनी मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलं आहे, त्यानंतर आता हे दोघे ही छोट्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com