Sairat Re-released : आता पुन्हा चित्रपटगृहामध्ये वाजणार झिंगाट! 'सैराट' होणार पुन्हा प्रदर्शित
नागराज मुंजळे दिग्दर्शीत 'सैराट' चित्रपटाने महाराष्ट्रालाच नाहीतर पुर्ण जगाला याडं लावल होत. या चित्रपटाच्या गाण्यावर लहानपासून ते मोठ्याचे पाय धिरकतात. नागराज मुंजळे प्रेक्षकांच्या मनावर अभिजात राज्य करत आहे. अजय-अतुल यांच्या संगीताने 'सैराट'ने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती. 2016 मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटींहून अधिकची कमाई करणारा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. येत्या 21 मार्चला सैराट पुन्हा एकदा प्रेक्षकांना याड लावायला येणार आहे. नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत प्रेक्षकांना माहिती दिली आहे.
सैराटच्या पुन: प्रदर्शबाबत नागराज मंजुळे म्हणतात की, "आम्ही चित्रपटाची निर्मीती केली तेव्हा विचार केला नव्हता की, प्रेक्षकांना चित्रपट येवढा आवडेल. तसेच महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण जगाने चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याने मी झी स्टुडिओजचे खूप आभार मानतो. चित्रपटाच्या पुन:प्रर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल, याची मला खात्री आहे."
रिंकू राजगुरू म्हणते की, " 'सैराट' हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटाने मला फक्त ओळख नाही, तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागाही दिली.‘सैराट' पुन्हा प्रदर्शित होत आहे याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन."