जय हनुमान! थिएटरमध्ये 'बजरंगबली'साठी एक सीट होणार बुक

जय हनुमान! थिएटरमध्ये 'बजरंगबली'साठी एक सीट होणार बुक

प्रभासच्या आदिपुरुष या बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रामायणावर आधारित या चित्रपटासाठी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभासच्या आदिपुरुष या बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रामायणावर आधारित या चित्रपटासाठी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी निर्मात्यांनी प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक सीट रिझर्व्ह ठेवण्याची घोषणा केली आहे.

आदिपुरुषबद्दल चाहत्यांना आधीच उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी आता हा चित्रपट प्रदर्शित करताना प्रत्येक चित्रपटगृहात भगवान हनुमानासाठी एक सीट रिझर्व्ह ठेवण्याची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी ही घोषणा चित्रपटाच्या रिलीजच्या अवघ्या 10 दिवस आधी केली होती.

याविषयी सांगताना निर्मात्यांनी म्हंटले की, जेव्हाही रामायणाचे पठण केले जाते तेव्हा तेथे हनुमान प्रकट होतात. हा आमचा विश्वास आहे. या श्रद्धेचा मान राखून आदिपुरुषाच्या प्रत्येक स्क्रीनिंगदरम्यान विक्री न करता एक सीट राखीव ठेवली जाईल. रामाच्या सर्वात मोठ्या भक्ताचा सन्मान करण्याचा इतिहास ऐका. हे महान कार्य आम्ही अज्ञात मार्गाने सुरू केले. हनुमानाच्या सान्निध्यात आपण सर्वांनी आदिपुरुषाचे मोठ्या दिमाखात दर्शन घेतले पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, 500 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या आदिपुरुषने रिलीजपूर्वीच 432 कोटी वसूल केले आहेत. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाने नॉन-थिएटर कमाईतून २४७ कोटी रुपये कमावल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमविण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आदिपुरुष चित्रपटात श्रीरामाची भूमिका प्रभास साकारणार आहे. तर, सीतेमातेच्या भूमिकेत क्रिती सॅनॉन झळकणार आहे. याशिवाय हनुमानाची भूमिका मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे निभावणार आहे. हा चित्रपट 16 जूनपासून थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com