Oscar Awards : 96व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा; सात पुरस्कार पटकावत 'ओपनहायमर'ची बाजी

Oscar Awards : 96व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा; सात पुरस्कार पटकावत 'ओपनहायमर'ची बाजी

96व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

96व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये 'ओपनहायमर' चित्रपटाने बाजी मारली आहे. 'ओपनहायमर' चित्रपटाला तब्बल सात पुरस्कार मिळालं आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्यासह 7 पुरस्कार ओपनहायमरने पटकावलं आहेत.

या चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 13 नामांकनं मिळाली होती. ख्रिस्तोफर नोलनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 अॅकेडमी पुरस्काराची घोषणा झाली.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेता किलियन मर्फी याला मिळाला. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार हा Hoyte Van Hoytema याला मिळाला तर जेनिफिर लेनला बेस्ट एडिटींगचा पुरस्कार मिळाला. क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com