ऑस्करची नामांकन यादी जाहीर होणार; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार इव्हेंट?

ऑस्करची नामांकन यादी जाहीर होणार; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार इव्हेंट?

ऑस्कर-2023 ची नामांकन यादीजाहीर केली जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ऑस्कर-2023 ची नामांकन यादीजाहीर केली जाणार आहे. ऑस्कर विजेते अभिनेता-निर्माते रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स हे हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत. याची घोषणा आज कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स थिएटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली जाणार आहे.

ऑस्कर- 2023 साठी भारताकडून 'आरआरआर' आणि 'छेल्लो शो' हे चित्रपट भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील ओव्हेशन हॉलिवूड डॉल्बी येथे पार पाडणार आहे.

ऑस्कर डॉट कॉम, ऑस्कर डॉट ओआरजी तसेच अॅकॅडमी डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऑस्कर नॉमिनेशन सोहळा पाहता येईल. भारतातील प्रेक्षकांना हा सोहळा संध्याकाळी सात वाजता पाहता येणार आहे.

या कॅटेगिरीमधील नामांकन यादी होणार जाहीर

प्रमुख भूमिकेत अभिनेता

प्रमुख भूमिकेत अभिनेत्री

सहाय्यक भूमिका (अभिनेता)

सहाय्यक भूमिका (अभिनेत्री)

अॅनिमेटेड फीचर फिल्म

अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

कॉस्टुम डिझाइन

लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म

मेकअप आणि हेअर स्टायलिंग

संगीत (ओरिजनल स्कोअर)

साऊंड

लेखन (रूपांतरित पटकथा)

लेखन (मूळ पटकथा)

सिनेमॅटोग्राफी

दिग्दर्शन

डॉक्युमेंट्री फिचर फिल्म

डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म

फिल्म एडिटिंग

आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

संगीत (ओरिजनल साँग)

सर्वोत्तम पिक्चर

प्रोडक्शन डिझाइन

व्हिज्युअल इफेक्ट्स

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com