A R Rahman Hospitalised :ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांची प्रकृती बिघडली
'छावा' चित्रपटाला संगीत देणारे आणि ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या रविवारी सकाळी छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने चेन्नईतील ग्रीम्स रोड इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता रेहमान यांना रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या. छातीत दुखत असल्याने रेहमान यांची ईसीजी (ECG) आणि इकोकार्डिग्राफी यासारख्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
भारतीय चित्रपट सृष्टीतील यशस्वी संगीतकारांमध्ये ए. आर. रेहमान यांचे नाव घेतले जाते. त्यांना असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ज्यामध्ये दोन अकादमी पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब आणि सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसेच भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण याचा देखील समावेश आहे.
ए. आर. रेहमान यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, ए. आर. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांच्यासोबत 1995 रोजी लग्न बंधनात अडकले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. गेल्या वर्षा नोव्हेंबरमध्ये त्यादोघांचा घटस्फोट झाला.