Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding: 'या' दिवशी होणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं शुभमंगल सावधान!

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding: 'या' दिवशी होणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं शुभमंगल सावधान!

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचा शुभमुहूर्त ठरला आहे.
Published by  :
Team Lokshahi

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. विशेष म्हणजे दिल्ली येथे काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा पार पडलाय. अत्यंत कमी आणि खास लोकांच्या उपस्थित यांचा साखरपुडा झाला.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचा शुभमुहूर्त ठरला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह 23 आणि 24 सप्टेंबरला पार पडणार आहे. या दोघांनी डेस्टिनेशन वेडींगसाठी राजस्थानची निवड केली आहे. उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये लग्नाच्या विधींसाठी बुकींग करण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. या दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यापासूनच चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

या दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम आणि विधी 23 आणि 24 सप्टेंबरला पार पडणार आहेत. यासाठी उदयपूरमधील शानदार हॉटेलमध्ये बुकींग केली जात आहे. काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नाच्या तयारीसाठी उदयपूरमध्ये हजेरी लावली होती. दोघांनी राजस्थानच्या उदयपूर पर्यटन विभागाच्या उपसंचालकांची भेट घेत तेथील उत्तम ठिकाणे आणि हॉटेल्सची माहिती घेतली होती.

राघव आणि परिणीतीचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबरला होणार आहे. 22 तारखेपासून पाहुण्यांचं आगमन सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या लग्नसोहळ्याची तयारी खूप जोरात सुरु आहे. 23 सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरु होतील. परिणीती आणि राघव यांचा 13 मे रोजी दिल्लीत साखरपुडा झाला होता आणि आता त्यांचं लग्न होणार आहे. या लग्नाला राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com