Pet Puran Web SeriesTeam Lokshahi
मनोरंजन
'पेट पुराण'चा ट्रेलर रिलीज
आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व संघर्ष दर्शविणार आहे
'पेट पुराण' (pet puran) ही वेब सिरीज आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व संघर्ष यांना दर्शविते. या जोडप्याची मुले व कुटुंब नसण्याची इच्छा आहे. परिपूर्ण कुटुंबाप्रती त्यांचा अपारंपारिक व आगळावेगळा दृष्टीकोन आहे.
या वेब सिरीजमध्ये सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) एकत्र पाहायला मिळणार आहेत. सोनी लिव्हवर (Sony Liv) 6 मे पासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये अदितीच्या भूमिकेत सई ताम्हणकर आणि अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. 'पेट पुराण' ची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे आणि ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोचे निर्माते आहेत. 'पेट पुराण' मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये पाहता येणार आहे.