Vicky Kaushal Marathi Poem : 'कणा'..., विकी कौशलने सादर केली मराठीत कविता,
मराठीतील थोर साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. आजच्या दिनाचे औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने मराठी गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेता विकी कौशलने उपस्थिती लावली. या कार्यक्रमामध्ये विकी कौशलने मराठीमध्ये कविता सादर केली आहे.
कार्यक्रमामध्ये विकी म्हणतो की, एक अमराठी असून महाराष्ट्रमध्ये राहतो, शिकतो, काम करतो, यांचे तिथे महाराष्ट्रमध्ये असणे छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ते पण मराठी भाषा दिवशी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मी मनापासून सर्वांचे आभार मानतो. सगळे रंगमंच्यावर कविताचे वाचन करत आहेत .तेव्हा आशाताई मला विचारतात की, तु पण कविता वाचणार आहेस. खरं सांगू मला राज ठाकरे यांनी सांगितले की, मराठी कविता वाचायची आहे. कुसुमाग्रजांची कविता 'कणा'. कणा या शब्दाचा अर्थ मला 'छावा' चित्रपट करताना समजला.
विकीने वाचलेली कविता
कणा
ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन
माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले
कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बान्धतो आहे चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरि मोडला नाहि कणा
पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा.
अभिनेता विकी कौशल याने मराठी गौरव दिनानिमित्त या कवितेचे वाचन केले आहे.