सुपरस्टार रजनीकांत यांचा आज सर्वोच्च सन्मान
सुपरस्टार रजनीकांत यांचा आज सर्वोच्च सन्मान होणार आहे. (superstar rajinikanth reaction on winning dadasaheb phalke award) दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आज 24 ऑक्टोबर रोजी चेन्नईतील त्यांच्या घराबाहेर माध्यमांची भेट घेतली. त्यांनी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीत या त्यांनी सांगितले की, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळण्याची मला अपेक्षा नव्हती. हा पुरस्कार स्वीकारताना पाहण्यासाठी गुरू केबी (के बालचंदर) सर हयात नाहीत याचे मला दुःख आहे, असेही त्यांनी सांगितले.
रजनीकांत यांना आज 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे. डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. चाहत्यांमध्ये थलायवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार.