Rakhi Sawant Video | राखी सावंतने शिकवली लस घेण्याची नवी पद्धत

Rakhi Sawant Video | राखी सावंतने शिकवली लस घेण्याची नवी पद्धत

Published by :

या लसीकरणाचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिनं लस घेण्याची नवी पद्धत आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आपल्यावादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी राखी चक्क लसीकरणामुळं चर्चेत आहे. नुकतीच तिनं कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लस घेतली. या लसीकरणाचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Viral या व्हिडीओद्वारे तिनं लस घेण्याची नवी पद्धत आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.

राखीनं नुकताच सोशल मिडीयावर लस घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. लस घेण्यापूर्वी ती प्रचंड घाबरली होती. डॉक्टरांनी तिची भीती दुर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान राखीनं आपल्या आगामी म्युझिक अल्बममधील 'तेरे ड्रीम में मेरी एण्ट्री' हे गाणं गायलं. अन् हे गाणं गाताना लस घेतली. जर तुम्हाला देखील लस घेण्याची भीती वाटत असेल तर हे गाणं गा, तुमची भीती दूर होईल असा सल्ला राखीनं या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com