Rakhi Sawant : राखी सावंतला होणार अटक? काय आहे नेमकं प्रकरण?

Rakhi Sawant : राखी सावंतला होणार अटक? काय आहे नेमकं प्रकरण?

नुकताच राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. इतकंच नाही, तर राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यासाठीदेखील न्यायालयाने नकार दिला आहे.
Published by :
Team Lokshahi

बॉलिवूडमध्ये 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असते. नुकतंच राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. इतकंच नाही, तर राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यासाठी देखील न्यायालयाने नकार दिला आहे.

राखी सतत तिच्या अतरंगी कपड्यांमुळे तर कधी चित्रविचित्र वागण्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखी सावंतने पूर्व पती आदिल खान दुर्रानीचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 'राखी सावंतने माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ शेअर केला आहे', असे आदिलने म्हटले आहे. राखीविरोधात आदिलने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राखी सावंतला अटक होण्याची शक्यता आहे. याविरोधात राखीने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. परंतु, न्यायालयाने राखीचा अर्ज फेटाळला आहे.

कोण आहे आदिल खान दुर्रानी?

आदिल खान दुर्रानी अभिनेत्री राखी सावंतचा दुसरा पती आहे. आदिल खान कर्नाटकमध्ये राहणारा उद्योगपती आहे. सध्या राखी सावंत आणि आदिल दुर्रानी दोघेही एकमेकांवर वेगवेगळे आरोप करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com