'राम सेतू'च्या टीझरची सोशल मीडियावर उडवली खिल्ली; यूजर्सने सोशल मीडियावर शेअर केले मजेशीर मीम्स

'राम सेतू'च्या टीझरची सोशल मीडियावर उडवली खिल्ली; यूजर्सने सोशल मीडियावर शेअर केले मजेशीर मीम्स

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतूचा टीझर रिलीज झाला आहे. टीझर रिलीज होताच यूजर्स सोशल मीडियावर मीम्स शेअर करून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सची खिल्ली उडवली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतूचा टीझर रिलीज झाला आहे. ‘राम सेतु’ येत्या दिवाळीला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘राम सेतु’चा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा एक नवा लूक पाहायला मिळत आहे.

“राम सेतू को बचाने के लिए हमारे पास सिर्फ तीन दिन है” या अक्षयच्या संवादाने टीझरची सुरुवात होते. त्यानंतर अ‍ॅक्शन सीन्सची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिसही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. चित्रपटाच्या टीझरमध्ये जॅकलिनच्या लूकची झलक पाहायला मिळत आहे. अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

टीझर रिलीज होताच यूजर्स सोशल मीडियावर मीम्स शेअर करून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सची खिल्ली उडवली आहे. चला तर हे मिम्स आपण पाहूया

Admin
Admin
Admin
Admin
Admin
Admin
Admin
'राम सेतू'च्या टीझरची सोशल मीडियावर उडवली खिल्ली; यूजर्सने सोशल मीडियावर शेअर केले मजेशीर मीम्स
Ramsetu : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'राम सेतू'चा लूक रिलीज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com