Bollywood actress Raveena Tandon's father has passed away. On this occasion, Raveena posted an accountant brother on her Twitter.
Bollywood actress Raveena Tandon's father has passed away. On this occasion, Raveena posted an accountant brother on her Twitter.

Raveena Tandon | वडिलांच्या तेराव्याला जुने फोटो शेअर करत रवीना टंडन झाली भावूक

Published by :
Shweta Chavan-Zagade

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिच्या (Ravi Tandon) वडीलांचे (११ फेब्रुवारीला) निधन झाले आहे. रवीनाचे वडील हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक (Film director) होते. त्यांनी वयाच्या (86 वर्षी )अखेरचा श्वास घेतला असून गुरूवारी त्यांचे तेरावे होते. या निमित्ताने रवीनाने तिच्या ट्विटरवर आकाउंटनर एक भाऊक पोस्ट केली.

रवीनाने ट्विटरवरील (twitter) पोस्टमध्ये तिने तिच्या वडिलांसोबतचे जुने फोटो (Photo) शेअर केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लिहिलेला शोकपत्राचा फोटोही तिने शेअर केला आहे. रवीनाने शेअर केल्या फोटोमधील एका फोटोमध्ये तिला तिच्या वडीलांनी उचलून घेतले असून दुसऱ्या फोटोमध्ये कॅमेरा हातामध्ये घेऊन फोटो काढला आहे. तिने शेअर केलेले फोटो हे फार जुन्याकाळातील आहेत.

रवीनाने या पोस्टला कॅप्शन (Caption) लिहिता म्हणाली की, "आज माझ्या वडिलांचे तेरावं आहे. असे म्हणतात की हा तो दिवस आहे जेव्हा आत्मा आपले सर्व बंधन सोडून स्वर्गात विसावा घेण्यासाठी जातो. त्यांच्यावर प्रेम केल्याबद्दल आणि आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. ते एक सज्जन दिग्दर्शक होते आणि आहेत. खूप प्रेम."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com