मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनेवर आता मिळणार आराम; शिल्पाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनेवर आता मिळणार आराम; शिल्पाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग

Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मासिक पाळीच्या (Menstruation ) काळात अनेक महिलांना वेदना होतात. दर महिन्याला होणाऱ्या वेदना आता कमी होणार आहेत. तर आता तुम्ही म्हणाल त्या कशा तर  अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (shilpa shetty) सोशल मीडियावर (social media )  एक व्हिडीओ (video) शेअर केला आहे. या व्हिडीओतून महिलांना मासिक पाळी (Menstruation ) दरम्यान होणाऱ्या वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. या काळात वेदना थांबवण्यासाठी काही महिला औषध घेतात. पण डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेतलं तर त्याचा वाईट परिणाम होवू शकतो.

शिल्पाने व्हिडीओत सोपे योगासन (yoga)  दाखवले आहेत. शिवाय तिने कॅप्शनच्या माध्यमातून सर्व महिलांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 'महिलांना मासिक त्रास अनेक वर्ष सहन करावा लागतो. ही साधी गोष्ट नाही. जर तुमच्या अनेक जबाबदाऱ्या असतील, तर फारचं कठीण…, रोज स्वतःसाठी वेळ काढून योग केल्यानंतर वेदना कमी होतील… यामुळे मासिक पाळी नियमित येईल आणि वेदना देखील होणार नाहीत…'

शिल्पाचा हा video सध्या सोशल मीडियावर चांगलाच viral होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com