Saif Ali Khan : 'या' कारणामुळे सैफ अली खान रुग्णालयात दाखल

Saif Ali Khan : 'या' कारणामुळे सैफ अली खान रुग्णालयात दाखल

सैफ अली खानबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी सकाळी सैफ अली खानला मुंबईमधील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले होते.
Published by :
Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी सकाळी सैफ अली खानला मुंबईमधील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आहे. यादरम्यान सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरदेखील त्याच्यासोबत उपस्थित होती. सैफला शुटींगदरम्यान दुखापत झाल्याचे समजत आहे.

माहितीनुसार, सैफ अली खानला शुटींगदरम्यान दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला आणि छातीला मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे सैफ अली खानच्या गुडघ्यावर आणि छातीवर शस्त्रक्रिया केली. सध्या सैफ अली खानची प्रकृती ठीक असल्याचे समजत आहे. यापूर्वी 2016 साली सैफ अली खानच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया केली होती.

सैफ अली खानला ही दुखापत कधी आणि कशी झाली याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. याबद्दल करीना कपूर खानकडूनही कोणती अपडेट मिळाली नाही. दरम्यान, ही बातमी समजताच सैफचे चाहते काळजीत पडले आहेत. त्याच्या निरोगी आयुष्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com