Salman Khan: आता लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम! भाईजान साठीत पोहोचला; ग्रँड पार्टी कुठे रंगणार, कोण असणार उपस्थित?
बॉलिवूडमध्ये ज्याचं नाव घेताच चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं, तो ‘दबंग स्टार’ सलमान खान आता आयुष्याच्या साठाव्या वर्षात पदार्पण करत आहे. २७ डिसेंबरला सलमान खान आपला ६० वा वाढदिवस साजरा करणार असून, हे ऐकूनही अनेक चाहत्यांना विश्वास बसणं कठीण आहे. आजही तोच रुबाब, तोच स्वॅग आणि तोच ‘भाईजान’ अंदाज कायम ठेवणाऱ्या सलमानची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानच्या वाढदिवसासाठी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी उसळणार, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते ती म्हणजे सलमान आपला खास दिवस नेमका कसा साजरा करतो?
६० वा वाढदिवस, पण साधाच सेलिब्रेशन विशेष म्हणजे एवढा मोठा टप्पा गाठूनही सलमान खान भव्य-दिव्य पार्टीऐवजी साधेपणालाच प्राधान्य देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाही सलमान आपला वाढदिवस पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसवरच साजरा करणार आहे. कुटुंबीय आणि काही मोजके जवळचे मित्र यांच्यासोबत एक खाजगी गेट-टुगेदर ठेवण्यात येणार आहे.
६० वा वाढदिवस, पण साधाच सेलिब्रेशन विशेष म्हणजे एवढा मोठा टप्पा गाठूनही सलमान खान भव्य-दिव्य पार्टीऐवजी साधेपणालाच प्राधान्य देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाही सलमान आपला वाढदिवस पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसवरच साजरा करणार आहे. कुटुंबीय आणि काही मोजके जवळचे मित्र यांच्यासोबत एक खाजगी गेट-टुगेदर ठेवण्यात येणार आहे.
खास ट्रिब्यूटची तयारी
सलमानच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त एक खास सरप्राईजही तयार करण्यात आलं आहे. त्याच्यासोबत काम केलेल्या दिग्दर्शकांचे संदेश असलेला एक विशेष व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्यामध्ये सलमानचा संपूर्ण फिल्मी प्रवास, आठवणी आणि अनुभव दाखवले जाणार आहेत. हा ट्रिब्यूट सलमानसाठी भावनिक ठरण्याची शक्यता आहे.
पापाराझींसोबत केक कापणार
कोट्यवधी चाहत्यांचा लाडका भाईजान नेहमीप्रमाणे यंदाही पापाराझींना विसरणार नाही. पार्टी सुरू होण्याआधी सलमान फोटोग्राफर्ससोबत केक कापणार असून, हा क्षण त्याच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. एवढा मोठा सुपरस्टार असूनही जमिनीवर पाय ठेवून वावरण्याची सलमानची शैलीच त्याला वेगळं स्थान मिळवून देते.
कामाच्या आघाडीवरही उत्सव
वाढदिवसाच्या आनंदात भर घालणारी आणखी एक खास बाब म्हणजे सलमानच्या आगामी चित्रपटाचा टीझर. सध्या सलमान ‘द बॅटल ऑफ गालवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा टीझर थेट सलमानच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो गंभीर आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, त्यासाठी त्याने आपल्या लूकवरही विशेष मेहनत घेतली आहे.
एकीकडे साठावा वाढदिवस, दुसरीकडे नव्या चित्रपटाचा टीझर त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या डबल सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही. वय केवळ आकडाच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करत भाईजान साठीतही तितक्याच दमदार अंदाजात चाहत्यांसमोर उभा राहणार आहे.
