शाहरुख-अक्षय आणि अजय अडचणी वाढल्या! हायकोर्टाने बजावली नोटीस

शाहरुख-अक्षय आणि अजय अडचणी वाढल्या! हायकोर्टाने बजावली नोटीस

शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने नोटीस बजावली आहे.

शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने नोटीस बजावली आहे. पान मसाला कंपन्यांच्या जाहिराती प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला ही माहिती दिली आहे. तसेच पुढील सुनावणीची तारीख 9 मे 2024 निश्चित करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. गुटखा कंपन्याच्या जाहिरात करणाऱ्या या कलाकारांवर कारवाई व्हायला हवी, असा त्यांचं म्हणणं होते. या प्रकरणी याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, 22 ऑक्टोबर रोजी सरकारला अहवाल देण्यात आला होता, मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. यानंतर अवमान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती.

यावर उत्तर देताना केंद्र सरकारच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी सांगितले की, केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर मागवले आहे. त्याचवेळी, न्यायालयाला असेही सांगण्यात आले की, करार रद्द करूनही अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीत दाखवल्याबद्दल संबंधित पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com