आज शाहरुख  खानचा पठाण चित्रपट रिलीज होणार
Admin

आज शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होणार

पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले आहे.

अमरावतीमध्येही आज पठाण सिनेमाच्या पहिल्या शो साठी एका शाहरुख खानच्या फॅनने अख्खा थिएटर बुक केला. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलय. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी आज सकाळी 9 ते 12 वाजताचा शो बुक केला असून यापूर्वी त्याठिकाणी शाहरुख खानच्या फॅन कडून केक कापून सिनेमा पाहिला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com