…मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये काय फरक? सुमित राघवन भडकला

…मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणाऱ्यांमध्ये काय फरक? सुमित राघवन भडकला

Published by :
Published on

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एक ना अनेक आरोप केले आहेत. या सर्व आरोपांवर उत्तर देण्यासाठी समीर वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर मैदानात उतरली आहे. या प्रकरणाच्या संदर्भाने लोकप्रिय लेखिका शेफाली वैद्य आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) यांच्या ट्वीटरवर चांगलीच जुंपली आहे.

मॉडेल्सने टिकली न लावल्यामुळे नुकतंच नुकतंच एका जाहिरातीवर काही जणांनी बहिष्कार टाकला होता. या ट्वीटर वॉरची सुरुवात झाली ती सुमित राघवनची पत्न चिन्मयी सुमित (ChinmayeeSumeet) हिच्या एका पोस्टने.
मला अनावर इच्छा झाली होती, एखादी सणसणीत पोस्ट टाकायची. पण ती 'टिकली'नाही, अशी पोस्ट चिन्मयीने लगावला होता.

तिच्या या बोच-या पोस्टवर शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत चिन्मयीला चांगलंच सुनावलं होतं. ते टिकलीचं राहू द्या, पण थोडा सणसणीतपणा जरा क्रांती रेडकरबद्दल दाखवा की, की त्या विषयावर बोलताना धडधडीत शेपूट घातली? असा सवाल त्यांनी केला होता. शेफालींच्या या प्रत्त्युतरावरूनच सुमित राघवन संतापला आहे.

शेफाली ताई,मी एवढंच म्हणू इच्छितो. काल तुमच्या अनुयायांनी अतिशय घाणेरड्या भाषेचा प्रयोग करून तिला प्रचंड त्रास दिलाय. क्रांती बद्दल कळवळा आहे ते बरोबरच आहे परंतु तुम्ही एका शब्दाने चिन्मयीसाठी तुमच्या अनुयायांनी केलेल्या असभ्य भाषेचा निषेध केला का? काय फरक आहे मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणा-यांमध्ये? विचारसरणी आणि मुद्दे वेगळे असू शकतात ताई. हे अपमानास्पद आणि निषेधार्ह आहे,' अशी पोस्ट सुमित राघवन याने केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com