Shilpa shetty
Shilpa shetty

वेब सीरिज विश्वात शिल्पा शेट्टीची दमदार एन्ट्री; 'या' सीरिजमध्ये झळकणार

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी वेब सीरिजच्या शूटींगला सुरुवात केली आहे. लवकरच ही वेब सिरीज अमेझॉन प्राईम वर रिलीज होणार आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी या सीरिजच्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल प्लाटफॉर्मवर पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे तिने तिच्या आगामी वेब सीरिजचे पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले आहे.

इंडियन पुलिस फोर्स' शिल्पा शेट्टीच्या आगामी वेब सीरीजचे नाव आहे. नुकतेच शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करते आहे. या पोस्टरवर शिल्पा शेट्टीचा कडक लुक पाहायला मिळत आहे. यात शिल्पा शेट्टीने घातलेल्या टी शर्टवर पोलीस असे नाव दिसून येत आहे.

ही आगामी वेब सीरिज 'इंडियन पुलिस फोर्स' पोलिसांवर आधारित असणार आहे. या सीरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी झळकणार असून ही ८ भागांची सीरिज अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com