Raksha Bandhan 2023 : भाऊ मोठ्या मनाचा! शिव ठाकरेने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला दिलं खास गिफ्ट

Raksha Bandhan 2023 : भाऊ मोठ्या मनाचा! शिव ठाकरेने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला दिलं खास गिफ्ट

मराठमोळा शिव ठाकरे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मध्यमवर्गातील शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
Published by  :
Team Lokshahi

मराठमोळा शिव ठाकरे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मध्यमवर्गातील शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने हिंदी 'बिग बॉस'मध्येही त्याचा मराठी ठसका दाखवला होता. यंदाच्या रक्षाबंधनाला शिवने त्याच्या बहिणीला खास गिफ्ट दिलं आहे. शिवने त्याच्या बहिणीला आयफोन 14 प्रो गिफ्ट केला आहे. शिवच्या बहिणीचं नाव मनीषा असं आहे. तिला एक मुलगीही आहे.

इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत शिवने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून आयफोन दिल्यानंतर बहिणीच्या काय भावना होत्या, याबाबतही खुलासा केला. तो म्हणाला, "मी पहिला वडिलांकडून १०० रुपये घेऊन तिला ओवाळणीत एकच रुपया द्यायचो. आणि ते १०० रुपये स्वत:च्या खिशात घालायचो. यावर्षीची रक्षाबंधन खास होती. मी बहिणीला यावर्षी आयफोन १४ प्रो गिफ्ट म्हणून दिला आहे. हे पाहून तिला विश्वासच बसत नव्हता. आता माझे दिवस आले." शिवच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com