पाहा श्रेया घोषालनं काय ठेवले मुलाचे नाव …

पाहा श्रेया घोषालनं काय ठेवले मुलाचे नाव …

Published by :
Published on

बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने २२ मे रोजी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगम झाल्याचे तिने सांगितले होते. श्रेयाने बाळासोबतचा पहिला फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून मुलाचे नाव काय ठेवले हे देखील सांगितले आहे.

श्रेयाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर मुलगा आणि पती शिलादित्य मुखोपाध्याय यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने 'माझ्या मुलाची ओळख करुन देते देवयान मुखोपाध्याय. बाळाच्या जन्माने आमचे संपूर्ण जीवन बदलून गेले. त्याचा हा पहिला फोटो' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती देवयानच्या येणाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. तिने देवयानचे स्वागत करण्यासाठी केक आणला असल्याचे दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com