Good News: सिद्धार्थ आणि कियाराने दिली गोड बातमी, लवकरच येणार पाहुणा

Good News: सिद्धार्थ आणि कियाराने दिली गोड बातमी, लवकरच येणार पाहुणा

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा होणार आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या चाहत्यासोबत गोड बातमी शेअर केली आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​आता ​आई-बाबा होणार आहेत. लवकरच यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक खास फोटो शेअर करून ही बातमी दिली आहे.

कियारा आडवणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी इन्टावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पांढऱ्या रंगाचे विणलेले लहान हातमोजे हातात धरुन फोटो पोस्ट केली आहे. त्यासोबत दोघांनी एक कॅप्शन लिहिले आहे. "The greatest gift of our lives Coming soon"

सिद्धार्थने आज सकाळी ही बातमी सोशल- मीडियावर अकाऊंटद्वारे शेअर केली. दोघावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. 7 फेब्रुवारी 2023 रोजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवणी याचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. आता दोघेही लवकरत आई-बाबा होणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून आनंदाचा वर्षाव होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com