Kiara Advani & Sidharth Malhotra : गुडन्यूज! सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीला कन्यारत्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
(Kiara Advani & Sidharth Malhotra) बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. कियारा अडवाणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, सिद्धार्थ आणि कियारा आता आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कियारा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी जात असल्याचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिच्यासोबत तिचे कुटुंबही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले होते.
सिद्धार्थने स्वत: याबद्दलची पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली असून सिद्धार्थ -कियारा पोस्ट शेअर करत म्हणाले की, “आम्ही प्रचंड आनंदी आहोत, आमचं जग आता पूर्णपणे बदलून गेलंय. आम्हाला मुलगी झाली आहे. सिद्धार्थ -कियारा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थानमध्ये राजेशाही थाटात विवाह केला होता. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कियाराने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं.
यातच आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ही गुडन्यूज दिली आहे. संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.